Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: लाल मिरचीला उच्‍चांकी दर; नंदुरबार मार्केटमध्‍ये दोन लाख क्विंटल खरेदी अपेक्षीत

लाल मिरचीला उच्‍चांकी दर; नंदुरबार मार्केटमध्‍ये दोन लाख क्विंटल खरेदी अपेक्षीत

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : मिरचीचे आगार असलेल्‍या नंदुरबार जिल्‍ह्यात यंदा मिरचीची आवक चांगली होत आहे. मध्‍यंतरी मिरचीचे भाव कमी होते. मात्र आता आवक वाढल्‍यासोबतच दर देखील चांगले मिळत आहेत. नंदुरबार (Nandurbar) बाजार समितीमध्‍ये उच्‍चांकी दर मिळाला आहे. (Live Marathi News)

मिरची आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात हंगामापासूनच मिरचीचे चांगली आवक वाढली होती. मात्र हवामान खात्याने (Rain) पावसाच्या अंदाज वर्तवला असल्यामुळे मिरचीचे विक्रीत घट आली होती. मात्र आता पुन्हा आवक वाढल्या असून, आतापर्यंत एक लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. यावर्षी देखील दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नंदुरबार बाजार समिती (Bajar Samiti) गेले काही दिवसांपासून मिरचीचे भाव स्थिर आहेत. सध्या ओल्या लाल मिरचीला 3500 पासून 5500 पर्यंत भाव दिला जात आहे. मात्र काही प्रमाणावर मिरचीचा भाव देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीला ओल्या लाल मिरचीला आठ हजारापासून ते बारा हजार पर्यंत उच्चांक इतर या हंगामात मिळत आहे. मात्र सध्या मिरचीचा भाव स्थिर आहे. त्यामुळे भाव कधी वाढणार याकडे शेतकरी वर्गाच लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT