Nandurbar Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Heavy Rain : नंदुरबारमध्ये तुफान पाऊस; मोलगी- पिंपळखुटा भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला

Nandurbar News : मुसळधार पावसामुळे सातपुड्याचा नद्यांना पूर आला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या पिंपळखुटा गावानजीक असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक खोळंबली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. तर आज सकाळपासूनच सातपुडा पर्वत रांगेत तुफान असा पाऊस होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलेला आहे. दुसरीकडे पावसामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा होती. तर दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले होते. यानंतर आज पुन्हा पावसाचे आगमन झाले असून सातपुडा पर्वत रांगेत जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सातपुड्याचा नद्यांना पूर आला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या पिंपळखुटा गावानजीक असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक खोळंबली आहे. 

अनेक गावांचा संपर्क तुटला 
सातपुडा पर्वत रांगेतून येणाऱ्या पाण्यामुळे हाकडी नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने मार्गावर वाहतूक बंद झाली आहे. अर्थात महाराष्ट्र- गुजरात राज्यांना जोडणारा हा पूल आहे. दरम्यान पिंपळखुटा गावानजीक असलेल्या हाकडी नदीवरचा हा पूल असून पुरामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. अजून पाऊस सुरु राहिल्यास पुलावरील वाहतूक लवकर सुरु होण्याची शक्यता कमी आहे.   

पुलाची दुरावस्था 
गेल्या सहा वर्षापासून या पुलाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पूल नव्याने बांधण्यात यावा; अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने परिणामी पावसाळ्यात पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात महामार्ग बंद होण्याची परिस्थिती दरवर्षी उद्भवत असते. पुलावरून पाणी जात असल्याने जीव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याची देखील परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT