सचिन बनसोडे
शिर्डी (अहिल्यानगर) : साई मंदिरात देशभरात साईभक्त दर्शनासाठी येत असतात. रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते. मात्र कोणी महत्त्वाची व्यक्ती आल्यास त्या काळात भाविकांसाठी दर्शन बंद केले जाते. मात्र साई मंदिरात महत्त्वाच्या व्यक्ती आणि शिफारस दर्शनाला आता वेळेचे बंधन असणार आहे. साई संस्थानने ब्रेक दर्शन व्यवस्था लागू केली आहे. यानुसार महत्वाच्या व्यक्ती आणि शिफारस धारकांना ठराविक वेळेतच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत असतात. यामुळे भाविकांची मोठी गर्दी येथे असते. दरम्यान दर्शन घेण्यासाठी भाविकांना दर्शन रांगेत तासनतास उभे राहून दर्शन घेता येत असते. यातच साई मंदिरात महत्त्वाच्या व्यक्तींच्या शिफारस दर्शनामुळे दिवसभरात केव्हाही दर्शन रांग थांबवावी लागत होती. त्यामुळे सामान्य दर्शन रांगेतील भक्तांनी नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता हि पद्धत बंद आता बंद करण्यात आली आहे.
ब्रेक दर्शन व्यवस्था
सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणोवरही अतिरिक्त ताण येत होता. या पार्श्वभूमीवर संस्थानच्या तदर्थ समितीने महत्त्वाच्या आणि शिफारस धारक व्यक्तींसाठी दर्शन वेळा निश्चित केल्या आहेत. या 'ब्रेक दर्शन' व्यवस्थेमुळे सामान्य दर्शन रांगेतील भक्तांना जास्तवेळ ताटकळत रहावे लागणार नाही. अर्थात दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत थांबावे लागणार नसून मंदिर समितीने निश्चित केलेल्या वेळेतच महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन घेता येणार आहे.
अशी असेल महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेळ
ब्रेक दर्शन व्यवस्थेत महत्त्वाच्या व्यक्तींना सकाळी ९ ते १०, दुपारी २:३० ते ३:३० आणि रात्री ८ ते ८:३० या वेळेतच ही दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. सामान्य साईभक्तांची दर्शन रांग न थांबवता महत्वाच्या आणि शिफारस धारक व्यक्तींना स्वतंत्र रांगेतून दर्शन दिले जाणार आहे. या ब्रेक दर्शन व्यवस्थेतून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि मोठ्या देणगीदारांना मात्र सूट देण्यात आली असून त्यांची दर्शनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच असेल असे साई संस्थानकडून सांगण्यात आले आहे.
ब्रेक दर्शनमधून यांना सूट
राजकीय आणि न्यायिक पदाधिकारी - भारताचे आजी-माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तसेच इतर न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष/उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, विधानसभा/ विधान परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष, आमदार, खासदार आणि विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश. यासह प्रसिद्ध उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्त्रज्ञ आणि साई संस्थानच्या व्यवस्थापन/तदर्थ समितीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्य, एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणारे साईभक्त यांना सूट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.