msrtc bus
msrtc bus 
महाराष्ट्र

धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा त्रास; प्रसंगावधानाने अनर्थ टळला

साम टिव्ही ब्युरो

शहादा (नंदुरबार) : गेल्या १६ दिवसांपासून राज्यात एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना शुक्रवारी (ता.१९) शहादा आगारातून धडगावसाठी पोलिसांच्या संरक्षणात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना झाली. मात्र काकडदा (ता. धडगाव) गावाजवळ अचानक बसचालकाला हृदय विकाराचा त्रास होवू लागल्याने त्यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसवाहक व प्रवाशांनी चालकास रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (nandurbar-news-Heart-attack-in-bus-driver-running-bus)

शुक्रवारी सकाळी साडेअकराला शहादा बसस्थानकातून शहादा-धडगाव ही बस (क्र. एमएच २० बीएल ०९१६) शहादा पोलिसांच्या संरक्षणात चालक अशोक कोळी व वाहक रवींद्र शिरसाट बसमध्ये पाच प्रवासी घेऊन धडगावसाठी रवाना झाले. या बसला शहादा पोलिसांनी म्हसावदपर्यंत संरक्षण दिले. तेथून पुढे म्हसावद पोलिसांनी फत्तेपूरपर्यंत संरक्षण दिले.

अतिदुर्गम भागात घटना

ही बस प्रवाशांना घेऊन धडगावकडे रवाना झाली. मात्र रस्त्यातच अतिदुर्गम सातपुडा पर्वतरांगेतील काकडदा गावाजवळ चालक अशोक कोळी यांना छातीत कळा आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्याकडेला उभी करत वाहक व प्रवाशांना त्रासाची जाणीव करून दिली. यामुळे कोळी यांना तत्काळ काकडदा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करीत शहादा येथील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी आगारप्रमुख वाय. एस. लिंगायत यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत श्री. कोळी यांना शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला.

कर्मचाऱ्यांवर मोठा दबाव

या संपूर्ण घटनेवरून संप सोडून पुन्हा सेवेत हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता स्थिर नसल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या संपात सामील न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्या कर्मचाऱ्यांची मानसिकता खचल्याने कालच्या घटनेवरून दिसून आल्याचे बोलले जात आहे. संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये अशोक कोळी हे कालपर्यंत सहभागी होते. मात्र पन्नाशीवर वय असल्याने नोकरी जाण्याच्या भीतीपोटी त्यांनी संपातून माघार घेत कामावर येण्याचा निर्णय घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT