जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० जागांसाठी आज (२१ नोव्हेंबर) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे. बँकेच्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित दहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यातील काही जागांमध्ये देखील शेतकरी विकास पॅनलने महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ही निवडणूक औपचारिकताच आहे. (jalgaon-news-jdcc-bank-election-today-voting-procce)
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत २१ जागांपैकी अकरा जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता रावेर, यावल, चोपडा, भुसावळ अशा चार विविध कार्यकारी सोसायटी व इतर संस्था व व्यक्ती, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती जमाती, वि.जा.भ.ज., यासाठी प्रत्येकी एक, तर महिला राखीव गटात दोन जागा, अशा सहा जागांसाठी मतदान होत आहे. जिल्हा बँकेच्या चार विविध कार्यकारी सोसायटी आणि पाच राखीव जागांसाठी रविवारी (ता. २१) मतदान होत आहे. यात ४२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पंधरा तालुक्यांत मतदान केंद्र आहे. सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदानाची वेळ आहे. एकूण दोन हजार ८५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दोन हजार ८५३ मतदार बजावणार हक्क
निवडणुकीसाठी एकूण दोन हजार ८५३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. विविध कार्यकारी सोसायटीचे ८५३, इतर संस्था व व्यक्तिगत सभासद दोन हजार मतदार आहेत. तालुकानिहाय स्थिती अशी जळगाव : वि. का.- ६२, इतर संस्था- ३३८ , भुसावळ- वि. का.- २६, इतर संस्था ११३, यावल-वि. का. ४८, इतर संस्था, २८५, रावेर- वि. का.- ५४, इतर संस्था- २४६, मुक्ताईनगर- वि. का.- २७, इतर संस्था- ४९, बोदवड- वि. का. ३८, संस्था- २२, जामनेर- वि. का. ९४, इतर संस्था- ११३, पाचोरा- वि. का. ७६, इतर संस्था- १०७, भडगाव- वि. का. ३९, इतर संस्था- ८९, चाळीसगाव- वि. का.- ७८, इतर संस्था- १०५, पारोळा- वि. का.- ६५, इतर संस्था- १२९, अमळनेर- वि. का.- ९२, इतर संस्था- ९४, चोपडा- वि. का.- ६४, इतर संस्था- १५२, धरणगाव- वि. का.- ५७, इतर संस्था- ८१, एरंडोल-वि. का.- ३३, इतर संस्था- ७७.
सोमवारी मतमोजणी
निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. २२) होणार आहे. जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.