Akkalkuwa  Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa : घाटरस्ता वाहिल्याने अक्कलकुवा तालुक्यातील रस्ता बंद; वाहतूक पूर्णपणे खोळंबली

Nandurbar News : सुमारे अर्धा ते एक किलोमीटरचा घाटरस्ता वाहून गेल्याने आणि मोठ्या दरडी कोसळल्याने जमाना ते नंदुरबार या जवळच्या मार्गावरील वाहतूक थांबली असून, नागरिकांचे मोठे हाल होत आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली पाहण्यास मिळत आहे. यात अक्कलकुवा तालुक्यात महत्त्वाचा मार्ग ठप्प झाला असून अस्तंबा, जमाना, ओरपा, नेंदवण ते खुर्चीमाळ हा अतिदुर्गम भागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग पावसाळ्यामुळे पूर्णतः बंद पडला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात अतिदुर्गम भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अतिपावसामुळे तर परिस्थिती अधिक खराब झाली असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांचे हाल होत आहे. सुमारे अर्धा ते एक किलोमीटरचा घाटरस्ता वाहून गेल्याने आणि मोठ्या दरडी कोसळल्याने जमाना ते नंदुरबार या जवळच्या मार्गावरील वाहतूक थांबली असून, नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

कोट्यवधी निधीवर प्रश्नचिन्ह 

कोट्यवधींच्या निधीवर प्रश्नचिन्ह २००८ मध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेला आणि २०२३ मध्ये जिल्हा परिषदेकडे वर्ग करून पुन्हा ८० लाखांचा निधी मिळालेला होता. यानंतर रस्ता तयार करण्यात आला होता. हा रस्ता बंद झाल्यामुळे इतका निधी खर्च करून काय उपयोग झाला? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून पाहणी 

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी गावकऱ्यांसह रस्त्याची पाहणी केली. यानंतर खुर्चीमाळ ते नेंदवण दरम्यान रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. विकासाच्या आशा मावळल्या असून या रस्त्यामुळे भागाचा विकास होईल अशी आशा होती, मात्र ती आता मावळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg Case : जुबीन गर्गचा अपघाती मृत्यू नव्हे,तर...; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितली धक्कादायक माहिती

कुणाल कामराचा आता थेट RSS शी पंगा, त्या 'टी'शर्टमुळे भाजपचा संताप, नेमके प्रकरण काय? VIDEO

Navneet Rana: मुख्यमंत्र्यांसमोर नवनीत राणा म्हणाल्या 'मी पुन्हा येईन', फडणवीसांनी जाहीर सभेत दिला शब्द

Winter Season : थंडीमध्ये घरात सॉक्स घालण्याचे जबरदस्त ८ फायदे

Winter Care: थंडीत तळपायांना पडलेल्या भेगा ७ दिवसात होतील गायब, १ घरगुती क्रीम ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT