Nandurbar Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : खोट्या सह्या, अंगठे घेत बँक कर्मचाऱ्याकडून खातेदारांची फसवणूक

Nandurbar News : काही ग्राहकांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी खात्यातून आपण पैसे काढलेच नाहीत. तर ते काढल्याचे दिसते कसे आहे? असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना उपस्थित केला

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : बॅंक खातेदारांच्या नावाने बनावट सह्या करून बॅंक कर्मचाऱ्यानेच बॅंकेतून सात लाखाचा अपहार करून फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार धडगाव येथील भारतीय स्टेट बॅंकेचा शाखेत घडली. (Nandurbar) याबाबत संशयितांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

धडगाव (जि.नंदूरबार) येथील भारतीय स्टेट बॅंकेची शाखा (SBI) असून या बॅंकेत नोकरी करणारे भिमसिंग वन्या राहसे यांनी पदाचा दुरुपयोग करीत बॅंक ग्राहकांचा खात्यातून त्यांच्या बनावट सह्या आणि अंगठे घेत खात्यातून पैसे काढून अपहार केले. २० जानेवारी २०१८ ते १७ आक्टोबर २०२० या कालावधीत श्री. राहासे यांनी एकूण सहा लाख ९५ हजार ९०० रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही ग्राहकांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी खात्यातून आपण पैसे काढलेच नाहीत. तर ते काढल्याचे दिसते कसे आहे? असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना उपस्थित केला. त्यामुळे (Bank) बॅंकेची शाखाधिकारी भूषण जयंत अत्रे यांनी चौकशी केली असता त्यात बॅंकेचे कर्मचारी असलेले भिमसिंग राहसे यांनी बनावट सह्या करून पैसे काढून अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यातून बॅंकेचा ग्राहकांची व बॅंकेची फसवणूक केली. याप्रकरणी शाखाधिकारी श्री.अत्रे यांनी धडगाव पोलिस (Dhadgaon Police) ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भिमसिंग राहसे याच्याविरूद्ध फसवणुकीचा व अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT