सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून राज्य सरकारने नंदुरबार जिल्ह्यातल्या ५२ पैकी ३६ महसूल मंडळांमध्ये (Drought) दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्राच्या पथकाने आज नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या बांधावर जात परिस्थितीचा आढावा घेतला. (Live Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत आणि गावकऱ्यांसोबत चर्चा करत या भागातील पिण्याच्या पाण्यापासून तर इतर समस्यांची चर्चा केली. तर दुष्काळाचा संदर्भात इतर माहिती जाणून घेत (Farmer) शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. नंदुरबार तालुक्यातील रनाळे आसाने घोटाणे न्याहाली बलदाणे या गावांमध्ये जात पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मदत देण्याची केली मागणी
जिल्ह्यात पाहणीसाठी आलेल्या केंद्रातील अधिकाऱ्यांना आपल्या भागातील दुष्काळाची दहाता सांगितले असून सरकारने दुष्काळ जाहीर केलेला असून सरकारने लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना द्यावी; अशी मागणी यावेळेस करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.