Fraud Case : शून्य टक्के व्याजाचे आमिष देत दोघांना दहा लाखांचा गंडा

Dhule News : २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान एनईएफटीद्वारे वेळोवेळी पाच लाख ९९ हजार ५०० रुपये तसेच त्यांच्या वाहिनीने तीन लाख ९९ हजार ८०० रुपयांचा भरणा
Fraud Case
Fraud CaseSaam tv
Published On

धुळे : शून्य टक्के दराने ५० लाखांचे कर्ज देतो, यासाठी आधी विमा पॉलिसी काढा; असे आमिष दाखवून एकाने दोन जनाची (Fraud) फसवणूक केली. यात दोघांना दहा लाखांचा गंडा घातला असून याप्रकरणी (Dhule) सायबर पोलिसांत तोतया व्यवस्थापक याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. (Latest Marathi News)

Fraud Case
Political News : स्वतःची पोळी भाजण्यासाठी काहीतरी बोलतात व प्रसिद्धी मिळवतात; आमदार विश्वनाथ भोईर यांचा आमदार राजू पाटलांना प्रत्युत्तर

साक्री तालुक्यातील दहिवेल येथील अजय शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मोबाईलवर संतोष वामन भोसले याने बजाज फायनान्स कंपनीचा अकाउंट व्यवस्थापक आहे, असे सांगून संपर्क केला. तसेच इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.ची विमा पॉलिसी घेतल्यास शून्य टक्के व्याज दराने प्रत्येकी ५० लाखांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fraud Case
Nanded News : उद्धव ठाकरे यांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा रद्द; हे आहे कारण

बनावट पत्रही दिले 
शिवाय हे कर्ज तुम्ही दरवर्षी पाच लाख याप्रमाणे दहा वर्षांत परतफेड करावयाचे आहे, अशी आकर्षक परतफेडीची योजना सांगितली. त्यानंतर कर्ज मंजूर झाल्याबाबतचे बनावट पत्रही दिले. त्यावर विश्वास ठेवून २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान एनईएफटीद्वारे वेळोवेळी पाच लाख ९९ हजार ५०० रुपये तसेच त्यांच्या वाहिनीने तीन लाख ९९ हजार ८०० रुपयांचा भरणा केला. मात्र, पैसे भरूनही ५० लाखांचे कर्ज न मिळाल्याने अजय पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरून संशयित संतोष भोसले याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com