Pandharpur News : मार्गशीर्ष महिन्यात विठुरायाचा गोपाळपुरी मुक्काम; विष्णूपद दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Pandharpur News : विठुरायाने आपल्या संवगडी व गाईसह क्रीडा केल्याचे व येथेच त्यांनी सर्वांसोबत वन भोजन केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटल्याची अख्यायिका आहे
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : आठ्ठवीस युगांपासून कर कटेवर ठेऊन भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असलेला सावळा विठुराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात (Pandharpur) गोपाळपूर जवळील चंद्रभागेतील विष्णूपद मंदिरात वास्तव्यास असतो असी अख्यायिका आहे. त्यामुळेच महिनाभर भाविक अवर्जून मंदिरात न जाता विष्णूपद येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. नुकताच मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने भाविकांची विष्णुपदावर गर्दी‌‌ वाढू लागली आहे. (Maharashtra News)

Pandharpur News
Nanded News : उद्धव ठाकरे यांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा रद्द; हे आहे कारण

विठ्ठल हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे इथे उमटलेल्या पावलांमुळे विष्णूपद असं नाव मिळाले आहे. दरवर्षी (Vtthal Mandir) मार्गशीर्ष महिन्यात साक्षात विठुराया  या ठिकाणी एक महिनाभर मुक्कामी राहायला येतात अशी आज विठुभक्तांची भावना असते. त्यामुळे राज्य भरातून अनेक भाविक मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपद येथे  दर्शनासाठी येतात. ‌विष्णूपदाकडे जाण्यासाठी चंद्रभागा नदीतून (Chandrabhaga River) नौका नयन करत जाता येते. तर वाहनातून गोपाळपूर येथे जाण्याची सोय आहे. येथे दर्शनासाठी महिनाभर भाविकांची गर्दी‌ असते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur News
Fraud Case : शून्य टक्के व्याजाचे आमिष देत दोघांना दहा लाखांचा गंडा

अशी आहे आख्यायिका 
पंढरपूरजवळच असलेल्या गोपाळपूर येथील चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन दगडी विष्णूपद मंदिर आहे. जेव्हा रूक्मिणी देवी (Vitthal Rukmini Mandir) देवावर रूसून दिंडीर वनात आली; तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले, ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजे विष्णूपद अशी‌ अख्यायिका पद्म पुराणात सांगितली आहे. येथील विष्णूपद मंदिरात एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची व काल्याच्या वाडग्याची देखील खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहूडा चरण मुरलीधराची आकर्षक अशी मूर्ती कोरण्यात आली आहे. याच ठिकाणी विठुरायाने आपल्या संवगडी व गाईसह क्रीडा केल्याचे व येथेच त्यांनी सर्वांसोबत वन भोजन केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटल्याची अख्यायिका आहे. 

दर्शनानंतर भाविक करतात वनभोजन 

भाविक शिदोरी‌ घेऊन या ठिकाणी येतात. दर्शनानंतर सहकुटुंब वनभोजनाचा आनंदही घेतात. मार्गशीर्षमध्ये पंढरपुरात वारीला आलेले वारकरी व दिंड्याही बारस सोडायला या ठिकाणी येतात. मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत येथे देवाचा मुक्काम असतो. महिनाभर विठ्ठल मंदिरात जे राजोपचार केले जातात ते सर्व रोजोपचार येथील विष्णूपद मंदिरात केले जातात असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com