Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नजर चुकवून मोबाईल व एटीएमचा वापर; महिलेची १ लाख ७१ हजारात फसवणूक

Nandurbar News : बँक खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार संध्या यार्दी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : नकळत मोबाईल व एसबीआय बँकेच्या एटीएमचा (ATM) वापर करून त्याद्वारे युपीआय आयडी तयार केला. यानंतर बँक खात्यातून १ लाख ७१ हजार रुपये परस्पर काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार (Nandurbar) नंदुरबारमध्ये घडला आहे. या प्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

नंदुरबारमध्ये वास्तव्यास असलेल्या संध्या मधुकर यार्दी यांची फसवणूक (fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान मुंबई भांडुप ईस्ट येथील अंकिता आनंद पालव व केशन मंगेश पालव यांनी निवृत्त सरकारी कर्मचारी संध्या वामनराव यार्दी (वय ६५) यांच्या नकळत मोबाईल व एसबीआय एटीएम कार्डचा वापर करून युपीआय आय डी तयार करून त्यांच्या (Bank) स्टेट बँक ऑफ इंडिया, नंदुरबार शाखेच्या बचत खात्यातून एकूण १ लाख ७१ हजार रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बँक खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार संध्या यार्दी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर आहेर तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:रघुवीर घाटात भीषण भूस्खलन; महामार्गाची एक बाजू दरीत वाहून गेली, वाहतूक पूर्णपणे बंद

Khopoli Hill Station : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

Om Bhutkar wedding: मराठमोळ्या अभिनेत्याने गुपचुप उरकलं लग्न?; बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

e-challan : तुम्हाला चुकून ई-चालान आलंय, ऑनलाइन कॅन्सल करता येईल का आणि ते कसं ? वाचा सविस्तर

Shirdi Sai Baba : शिर्डीला दर्शन घ्यायला जाताय? VIP दर्शन महागलं, आता किती रूपयांना मिळणार पास?

SCROLL FOR NEXT