Nandurbar Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News: कारागृहाबाहेर चोवीस तास पहारा तरीही पाच कैदी फरार; स्वच्छतागृहाची खिडकी तोडून पसार

कारागृहाबाहेर चोवीस तास पहारा तरीही पाच कैदी फरार; स्वच्छतागृहाची खिडकी तोडून पसार

साम टिव्ही ब्युरो

नवापूर (नंदुरबार) : येथील पोलिस ठाण्यातील कारागृहातून पाच कैदी सोमवारी सकाळी फरार झाले. ही घटना कळताच पोलिस (Police) प्रशासनाची कैद्यांना पकडण्यासाठी धावपळ सुरू झाली. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. (Letest Marathi News)

घटनेबाबत गुजरात (Gujrat) पोलिसांना कळवून कैद्यांना पकडण्यासाठी मदत घेतली आहे. पळालेले कैदी गुजरात राज्याच्या दिशेने उसाच्या शेतात लपल्याची (Nandurbar News) माहिती मिळाल्याने शोध घेण्यात आला. दुपारी गुजरात पोलिसांनी हैदर ऊर्फ इस्राईल ईस्माईल पठाण ( २०, रा. कुंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याला गुजरात पोलिसांनी पकडले आहे.

दगडी भिंतीतील खिडकी तोडली

नवापूर (Navapur) पोलिस ठाण्यातील कारागृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या शौचालयाच्या दगडी भिंतीत असलेल्या लाकडी खिडकी तोडून कैदी पळाले. कारागृहाबाहेर चोवीस तास पोलिस पहारा असतो. तरीही पाच कैदी फरार झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कैदी पळाले तो रस्ता चोविस तास रहदारीचा व वर्दळीचा आहे. त्यामुळे तो कुणालाही दिसले नाहीत का? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. दुपारनंतर गुजरातमधील पोलिसांनी एकाला पकडले असून उच्छल पोलिस ठाण्यात घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.

सोशल मिडीयावर केले फोटो व्‍हायरल

पळून गेलेले कैदी दरोड्यातील गुन्ह्यात अटक होती. या घटनेनंतर नवापूर तालुक्यात व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. कैद्यांना पकडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. सोशल मीडियावर फरार कैद्यांचे छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. पळालेल्या कैद्यांमध्‍ये इरफान इब्राहिम पठाण (वय ३५), युसुफ असिफ पठाण (वय २२), गौसखों हानिफखॉ पठाण (वय ३४, सर्व रा. ब्राम्हणी, गराडा, ता. कन्नड), अकिलखों ईस्माईलखॉ पठाण (२२, रा. कठोरा बजार, ता. भोकरदन) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुट्ट्या संपल्या, बॅक टू वर्क! पुण्यातील सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

Pune News : पुण्यातून मोठी बातमी, जैन बोर्डिंगचा जागेचा व्यवहार बिल्डरने केला रद्द

Success Story: कॉल सेंटर ते IPS, ८ बँकांच्या परीक्षा केल्या क्रॅक; दोनदा UPSC पास; सुरज सिंह परिहार यांचा प्रवास

Women’s World Cup: भारत-बांग्लादेशच्या सामन्यात पावसाची जोरदार बॅटिंग; मात्र विकेट पडली पाकिस्तानची

Sun transit: 12 महिन्यांनी सूर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश; 'या' राशींच्या घरी पडेल पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT