Mumbai Tourism: 26 जानेवारीला घरात बसू नका! मुलांसोबत मुंबईतील या ठिकाणी फिरा

Surabhi Jayashree Jagdish

२६ जानेवारी

२६ जानेवारी हा दिवस देशाच्या इतिहासाशी जोडलेला अभिमानाचा दिवस आहे. अशा दिवशी मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली तर स्वातंत्र्यलढा, वास्तुकला आणि भारताचा गौरवशाली भूतकाळ जवळून अनुभवता येतो.

India National Flag | Social Media

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं सर्वात ओळखलं जाणारं ऐतिहासिक स्मारक आहे. ब्रिटिश काळात बांधलेलं हे प्रवेशद्वार स्वातंत्र्यानंतरही इतिहासाची साक्ष देत उभं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेलं हे स्थान मुंबईच्या वास्तुकलेचा अभिमान आहे. ब्रिटिश, भारतीय आणि गॉथिक शैलीचं सुंदर मिश्रण याठिकाणी पाहायला मिळतं.

राजाबाई टॉवर

मुंबई विद्यापीठाच्या आवारात असलेला राजाबाई टॉवर हा ऐतिहासिक आहे. बिग बेनसारखी रचना असलेला हा टॉवर ब्रिटिश काळातील वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे.

मणि भवन

महात्मा गांधींशी संबंधित असलेलं मणि भवन हे स्वातंत्र्यलढ्याचं साक्षीदार आहे. गांधीजी मुंबईत असताना याच ठिकाणी वास्तव्यास होते. आज याठिकाणी संग्रहालय असून स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जवळून जाणू घेता येतो.

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी या प्राचीन काळातील शिल्पकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहेत. भगवान शंकराशी संबंधित गुहा आणि कोरीव काम पाहण्यासारखं आहे. इतिहास आणि पुरातत्त्वाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण आवर्जून पाहावं असं आहे.

आगाखान पॅलेस

मुंबईजवळील ऐतिहासिक ठिकाण म्हणून आगाखान पॅलेसचंही नाव घेतलं जातं. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आठवणी याठिकाणी जतन केल्या आहेत.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा