Electricity News: वीज बिलात होणार मोठी वाढ; सर्वसामान्य माणसाला दरवाढीचा शॉक...

वीजेचे दर तब्बल १० ते १८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
Electricity News
Electricity NewsSaam TV

Electricity News: वीज दरवाढी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे. महावितरणने वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असून वीजेचे दर तब्बल १० ते १८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांना वाढत्या वीज दराचा चांगलाच शॉक बसू शकतो. (Latest Marathi News)

साल २०२० मध्ये महातविरण कंपनीने वीजेच्या दरात वाढ केली होती. हे दर २०२५ पर्यंत कायम राहणार होते. मात्र मधल्या दोन वर्षात महावितरणाचे बरेच नुकसान झाले आहे. अनेक व्यक्तींनी या काळत वीज बिल भरले नाही. तसेच वीज गळती, खासगी वीज निर्मिती कंपनीला द्यावे लागणारे अतिरिक्त पैसे. यामुळे महावितरणाचे नुकसान होत आहे. त्यानुसार वीज दरवाढ व्हावी यासाठी महावितरणने आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.

Electricity News
MARINE EL HIMER : फ्रेंच मॉडेलने स्विकारला इस्लाम धर्म; आधीचा ग्लॅमरस लूक पाहून विश्वास बसणार नाही

या याचिकेवर विभागांनुसार सहा वेगवेगळ्या ठिकाणी सुनावणी होणार आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत अंतिम दरवाढ ठरेल आणि एप्रिल २०२३ पासून हे वाढीवदर नव्याने आकारले जाणार आहेत. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले आहे. या याचिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आधीच महागाईने रण पेटले आहे. भाजीपाला (Vegetables) , गॅस तसेच इतर आवश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशात ही वीजदरवाढ सामान्य नागरिकांची चिंता वाढवणार असल्याचे म्हटले जात आहे.

Electricity News
Electricity Bill : मराठवाड्यातील नेत्यांनीच थकवली लाखोंची वीज बिलं; कुणाकडे किती थकबाकी? वाचा सविस्तर...

दर वर्षी तब्बल १३ हजार कोटींच्या वीजेवर डल्ला

प्रत्येक राज्यात कोणत्याही उद्योगात १५ टक्क्यांपर्यंत वीज (Electricity) गळती होत असल्यास हा तोटा मानला जातो. वीज गळती म्हणजेच वीज चोरी, आयोगानेच अशी व्याख्या तयार केली आहे. महाविरण ही गळती १४ टक्के असल्याचे सांगते. मात्र प्रत्यक्षात ३० टक्क्यांहून अधिक गळती होत असल्याचे समजले आहे. यामध्ये सर्वाधिक गळती शेतीपंपांवर होताना दिसते. यात जवळपास १५ टक्के गळती होते. दर वर्षी १५ टक्के गळती म्हणजे साधारणत: १३ हजार कोटींची वीज चोरी होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे वाढीव वीज बिलाचा व्याप सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com