Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: पहिले आधार कार्ड प्राप्‍त महिलाच ‘शिधा’पासून वंचित; राष्‍ट्रवादीने दिला महिन्‍याचा किराणा

दिनू गावित

नंदुरबार : देशातले पहिले आधार कार्ड प्राप्त करणारी टेंभली गावातील महिला रंजना सोनवणे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या (Diwali) दिवाळी किट पासून वंचित राहिल्‍या. यामुळे (NCP) राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून त्‍यांना एक महिन्याचा शिधा देण्यात आला. (Tajya Batmya)

देशातले पहिले (Adhar Card) आधार कार्ड प्राप्त करणारी (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यामधील (Shahada) शहादा तालुक्यातील टेंभली गावातील महिला रंजना सोनवणे यांना दिवाळी सणात राज्य सरकार मार्फत मिळणारी आनंदाची शिधा देखील प्राप्त झाला नाही. यामुळे त्यांची संपूर्ण दिवाळी ही अंधारात गेली. असे म्हटले जाते की दिवाळी सर्वत्र उजेड निर्माण होतो. परंतु टेंभली गावातल्या देशातल्या प्रथम आधार कार्ड प्राप्त करणाऱ्या महिला रंजना सोनवणे यांची दिवाळी मात्र काळोखातच गेली.

घरी जावून दिला महिन्‍याचा किराणा

रंजना सोनवणे यांची व्यथा समजल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी लागलीच त्यांच्या घरी पोहचून त्यांची संपूर्ण व्यथा जाणून घेतली. यानंतर आज त्यांना एका महिन्याचा संपूर्ण किराणा देण्यात आला. या शिंदे– फडणवीस सरकारचे हे अपयश असून त्यांनी राज्यातल्या गोरगरीब जनतेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: KKRची दमदार कामगिरी; गंभीरच्या मार्गदर्शनाचं कौतुक करताना ढसाढसा रडला चाहता

Chhatrapati Sambhaji Nagar Election: ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

Jasprit Bumrah Yoker: बुमराहच्या चेंडूनं हवेतच बदलली 'चाल'; गुल झालेली दांडी पाहून सुनीलला काही सुचेना VIDEO

Maharashtra Politics: लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार

Mahadev App Scam: महादेव ॲपचं श्रीलंका कनेक्शन, EOW ने 200 खात्यांमधील 3 कोटी रुपये गोठवले

SCROLL FOR NEXT