NCP Saam Tv
महाराष्ट्र

Ketaki Chitale: केतकी चितळेविरुद्ध नंदुरबारात तक्रार दाखल

केतकी चितळेविरुद्ध नंदुरबारात तक्रार दाखल

दिनू गावित

नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा; यासाठी राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. (nandurbar news Filed a complaint against Ketaki Chitale in Nandurbar)

केतकी चितळेने (Ketaki Chitale) सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्‍याबद्दल अवमानकारक पोस्ट प्रसारित केली. यानंतर नंदुरबार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आज रविवारी सकाळी शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत केतकी चितळे विरुद्ध तक्रार दिली. शरद पवार देशाचे नेते असून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द जर कोणी वापरत असेल तर ते चुकीचे आहे. केतकी चितळे विरुद्ध कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार (Police) पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना दिली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी जोशी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष उषा वळवी, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र कोकणी, सुनील राजपूत, सुरेश वळवी, अदनान मेमन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT