Navapur Accident Saam tv
महाराष्ट्र

Navapur Accident : लग्न आटोपून घरी परतताना भीषण अपघात; नऊ जण जखमी, जखमीत पोलिसांचाही समावेश 

Nandurbar Navapur News : नवापूर तालुक्यातील श्रावणी गावालगत हा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. शाहा परिवार शहादा येथील लग्न समारंभमधून घरी वाहनाने सुरतकडे निघाले होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : शहादा येथे लग्न समारंभासाठी आलेला परिवार लग्न सोहळा आटोपून पार्टीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र परिवाराचा वाहनाला (Accident) अपघात झाला. नवापूर तालुक्यातील (Navapur) खांडबारा- विसरवाडी रस्त्यावर दोन कार आणि मोटरसायकल या तिन वाहनांचा भीषण अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

नवापूर तालुक्यातील श्रावणी गावालगत हा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. शाहा परिवार शहादा येथील लग्न (Marriage) समारंभमधून घरी वाहनाने सुरतकडे निघाले होते. दरम्यान श्रावणी गावाजवळ मोटरसायकल व (Nandurbar) समोरून येणारी अन्य एक कार असा तिहेरी वाहनांच्या भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये नऊ जण जखमी झाले आहे. सदर अपघातात तिन्ही वाहनांच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनास्थळी विसरवाडी व खांडबारा पोलिसांनी पोहोचून वाहने रस्त्याचे बाजूला केले. या अपघातात विसरवाडी अंतर्गत दोन पोलीस होमगार्ड यांच्या देखील समावेश आहे. हे दोघे पोलीस होमगार्ड एका ठिकाणाहून बंदोबस्त आपटून खांडबारा आऊट पोस्ट पोलीस स्टेशन येथे येत असताना अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांवर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime: रायगड हादरले! १७ वर्षीय मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

पनवेल-कर्जत प्रवास होणार सुसाट! रेल्वे मार्गासाठी 497 कोटी मंजूर; प्रवाशांना होणार मोठा फायदा

ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं नाव अन् चिन्ह; पक्ष-चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

SCROLL FOR NEXT