Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : बनावट कागदपत्रांचा आधारे मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती; नंदुरबार शिक्षण विभागाचा बोगस कारभार

Nandurbar News : रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून फसवणूक झालेल्या अनुकंप धारकालापरिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शिक्षण विभागातील भोंगळ कारभार कायम समोर येत असतो. शिक्षण विभागातील अनेक बोगस प्रकरण समोर येत असताना नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आलेला आहे. यामध्ये बनावट कागपत्रांच्या आधारे रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  

नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा अनागोंदी कारभार समोर आला आहे. यामध्ये शहादा तालुक्यातील एका संस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेत रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी अनुकंप धारकाची बोगस नियुक्ती करून नसलेल्या पदावर थेट अनुकंप धारक सागर इंगळे यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्थात अनुकंप धारकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार झाला आहे. 

चार वर्षांपासून नियुक्ती 

गेल्या चार वर्षांपासून अनुकंप धारकाची फसवणूक केल्याचा हा प्रकार असून अनुकंप धारक सागर इंगळे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थात या प्रकारातून अनुकंप धारकाला नियुक्ती देण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ज्या शाळेत नियुक्ती करण्यात आली; त्या ठिकाणी जागा रिक्त नव्हती किंवा पद मंजूर देखील नसल्याचा प्रकार समोर आला. यामुळे अनुकंप धारक सागर इंगळे यांची एकप्रकारे फसवणूक झाली आहे.  

न्यायासाठी कुटुंब बसले उपोषणाला 

अखेर अनुकंप धारक वारंवार यासंदर्भातील तक्रार करूनही संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने परिवारासोबत उपोषण करण्याची वेळ अनुकंपधारकावर आली आहे. जोपर्यंत संपूर्ण बोगस कारभाराचा पर्दाफाश होऊन संस्थेवर कार्यवाही होत नाही, न्याय मिळत नाही; तोपर्यंत संपूर्ण परिवारासोबत बेमुदत उपोषण करणार असल्याचा पवित्र अनुकंप धारक सागर इंगळे यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: दीपिका पादुकोणचा ‘मॉमी ग्लो’ लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update: परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या बैठका आणि मुलाखती

महागाईची झळ बसणार! सोनं उच्चांक गाठणार, पेट्रोल - डिझेलच्या किमती वाढणार; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Year in Search 2025: रात्रीच्या वेळेस मुलींनी इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च केलं?

Jobs : राज्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,३ लाख पदं रिक्त असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT