Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : मुदतबाह्य औषधी फेकली उघड्यावर; नंदुरबार तालुक्यातील भालेल परिसरातील प्रकार

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात औषधसाठा उघड्यावर फेकून दिल्याच्या घटना नवीन नाहीत. जिल्ह्यात बऱ्याचदा उघड्यावरच औषधसाठा फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : मुदतबाह्य औषधी उघड्यावर फेकून न देता त्याला योग्य पद्धतीने नष्ट करणे गरजेचे आहे. मात्र अशा प्रकारचा औषधसाठा उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार (Nandurbar) नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे समोर आला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात औषधसाठा उघड्यावर फेकून दिल्याच्या घटना नवीन नाहीत. जिल्ह्यात बऱ्याचदा उघड्यावरच औषधसाठा फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. सरकारी दवाखान्यातील (Hospital) औषधसाठ्याचा तुटवडा असल्याचा कांगावा आरोग्य विभागाकडून (Health Department) करण्यात येतो. तर दुसऱ्या बाजूला मुदत संपलेला औषधसाठा बऱ्याचदा उघड्यावर टाकण्यात येतो. तालुक्यातील भालेर शिवारात एमआयडीसीजवळ मोठ्या प्रमाणावर काही मुदतीत तर काही मुदतबाह्य झालेल्या औषधांचा साठा उघड्यावर फेकलेला आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खाजगी साठा असल्याचा दावा 

भालेर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरचा औषधसाठा खासगी असल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी धोकेदायक पद्धतीने औषधसाठा फेकल्याने संबंधिताची बेफिकीरी समोर आली असून याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: घाटकोपर पूर्वमधून पराग शाह विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT