Pandharpur News : वारकऱ्यांनी चंद्रभागा वाळवंटाची केली स्वच्छता

Pandharpur News : यात्रेनिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक विठठ्ल दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. यावर्षी देखील जवळपास ४ लाख भाविक माघी यात्रेनिमित्ताने आले होते
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : पंढरपूरमध्ये माघी एकादशीच्या निमित्ताने यात्रा घातली होती. या यात्रेनिमित्ताने ३ ते ४ लाख भाविक दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur) आले होते. भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान केले. या दरम्यान औसेकर महाराज फडावरील वारकऱ्यांनी आज चंद्रभागा वाळवंट आणि नदी पात्राची स्वच्छता केली. (Tajya Batmya)

Pandharpur News
Ahmednagar News : विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामस्थांनी पंचायत समितीत भरवली शाळा; शिक्षक हजर होत नसल्याने पालक संतप्त

पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी एकादशी प्रमाणे माघी एकादशीला (ekadashi) देखील यात्रा भरत असते. या यात्रेनिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक विठठ्ल दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. यावर्षी देखील जवळपास ४ लाख भाविक माघी यात्रेनिमित्ताने आले होते. चंद्रभागा नदीत स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतले. वारकरी देखील आले होते. भाविकांची संख्या अधिक असल्याने (Chandrabhaga River) चंद्रभागा नदी व वाळवंट भागात मोठ्या प्रमाणात घाण झाली होती. यामुळे आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur News
Jowar Crop : पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड

३०० पेक्षा जास्त वारकरी सहभागी 
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आज सकाळी चंद्रभागा वाळवंट आणि नदी पात्रात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेत सुमारे तीनशे हून अधिक वारकरी भाविक सहभागी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com