Taloda News Saam tv
महाराष्ट्र

Taloda News : सफाई काम करताना विजेचा जोरदार धक्का; तळोदा बाजार समिती शिपायाचा मृत्यू

Nandurbar News : नितेश धानका हा तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिपाई या पदावर कार्यरत होता. शनिवारी गोडाऊनच्या छतावर सफाई करत असताना त्याचा विजेच्या तारांना संपर्क झाला

Rajesh Sonwane

तळोदा (नंदुरबार) : तळोदा बाजार समितीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या इसमाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना बाजार समितीच्या आवारात घडली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गोडाऊनच्या छतावर चढून सफाई करीत असताना हि घटना घडली आहे. 

नितेश जयसिंग धानका (वय ४०) असे मृत इसमाचे नाव आहे. सदरची घटना २८ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घडली. नितेश धानका हा (taloda) तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिपाई या पदावर कार्यरत होता. शनिवारी गोडाऊनच्या छतावर सफाई करत असताना त्याचा विजेच्या तारांना संपर्क झाला. यामुळे विजेचा जोरदार झटका बसून, तो खाली कोसळला. सदर घटनेनंतर बाजार समितीतील (Bajar Samiti) कर्मचाऱ्यांनी त्यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

नितेश याचा ज्या तारेला स्पर्श झाला ती तार ११ केव्ही वीज प्रवाहाची असल्याने जबर धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. आमदार राजेश पाडवी घटनास्थळी दाखल झाले. तसेच, तळोद्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू लोखंडे व कर्मचारी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT