Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : सातपुड्यातील आदिवासी तरुणींची गगन भरारी; दिव्या पावराची राज्य महिला फुटबॉल संघात निवड

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या दिव्या पावरा या आदिवासी तरुणीची राज्य महिला फुटबॉल संघात निवड झाली आहे. जयपुर येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाली आहेत. तिचे वडील रोजगार सेवक आहे; तर आई आश्रम शाळेत स्वयंपाक तयार करण्याचे काम करते. गरीब कुटुंबातील मुलीचे राज्य महिला फुटबॉल संघात निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सातपुड्यातील (Satpuda) दुर्गम भाग असलेल्या पाचव्या पुड्यात वसलेल्या धडगाव तालुक्यातील सोन खुर्द येथील दिव्या पावरा आहे. तिचे वडील विजयसिंग आत्माराम पावरा हे ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक म्हणून काम करतात. तर आई कमल पावरा या मुजरा आश्रम शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करत आहेत. चौदाशे लोकसंख्या (Nandurbar) असलेल्या सोन खु. या छोट्याशा गावामध्ये चौथीपर्यंत दिव्या पावराचे शिक्षण झाले. घरात पाच भावंडात दिव्या ही सर्वात मोठी आहे. पुढील शिक्षणासाठी तिने औरंगाबाद येथील सैनिकी विद्यालयात प्रवेश घेतला. 

शिक्षण घेत असताना तिला फुटबॉलची आवड निर्माण झाली. ती चांगलं खेळत असल्याचे पाहून तिची निवड पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत करण्यात आली. सध्या ती बारावीचे शिक्षण तेथेच घेत असून तिची नुकतीच राज्य महिला फुटबॉल संघात निवड झाली आहे. जयपूर येथे १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्यावतीने महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिव्या पावरा याची निवड करण्यात आली आहे. तिला प्रशिक्षक म्हणून धीरज मिश्रा हे मार्गदर्शन करीत आहेत.

घरची परिस्थिती बेताची
दिव्या पावरा ही आदिवासी तरुणी सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबातील आहे. तिचे वडील ग्रामपंचायत रोजगार सेवक आहेत. आई ही आश्रम शाळेत रोजंदारीवर स्वयंपाकी म्हणून काम करीत होती. वर्षभरापूर्वीच तिची कायमस्वरूपी नियुक्ती झाली. घरची परिस्थिती बेताची होती. वडिलांचे फक्त स्वतःचे घर आहे, जमीन नाही. मात्र शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजल्याने त्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले. याआधीही दिव्या पावरा या तरुणीची सतरा वर्षाच्या आतील संघात निवड झाली होती. या जुनियर संघात ती खेळल्यानंतर आता सीनियर संघात तिची निवड झाली आहे. देशासाठी खेळण्याची तिचे स्वप्न असून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करणार असल्याचे दिव्या पावराने सांगितले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde Join NCP: अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पावर गटात केला प्रवेश

Maharashtra News Live Updates : मध्यप्रदेशच्या रतलामवरून मुंबईला येणारा मोठा अफूचा साठा जप्त

Ajit Pawar: अजित पवार कॅबिनेट मिटिंगमधून बाहेर का पडले? खुद्द पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Tata Group : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडला; नाव आलं समोर

Bopdev Ghat Case : ७०० पोलीस, ७०० CCTV अन् ८० किमीपर्यंत धागेदोरे; असा सापडला पोलिसांना चकवा देणारा बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी

SCROLL FOR NEXT