Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: ऊस वाहतूक करताना जीवघेणी वाहतूक; क्षमतेपेक्षा जास्‍त भरला जातोय ऊस

ऊस वाहतूक करताना जीवघेणी वाहतूक; क्षमतेपेक्षा जास्‍त भरला जातोय ऊस

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीची लगबग सुरू आहे. ग्रामीण भागात (Sugarcane) ऊस तोडून तो कारखान्यात घेऊन जाण्यासाठी असलेले वाहतूकदार आपल्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन भरत असल्याने मोठ्या (Accident) अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Marathi News)

राणीपूर म्हसावद रस्त्यावर ऊस भरून येणाऱ्या (Nandurbar News) ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस असल्याने ट्रॅक्टरच्या पुढील दोन चाके हवेत तरंगत होती. या रस्त्यावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनांची ही मोठी संख्या असून रस्त्यावर या वाहनांचे प्रमाण हे अधिक होते. वजन असलेला ट्रॅक्टर चालकाला नियंत्रित करणे शक्य होत नसल्याचे लक्षात आल्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला थांबून ट्रॅक्टर थांबल्यावर वाहने मार्गस्थ केली.

ओव्हरलोड ट्रॅक्टरची स्टंटबाजी नेहमीचा विषय झाला असून धोकेदायक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना कोण आळा घालेल? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. छोट्या छोट्या कारणाने वाहन चालकांना हजारोच्या दंड देणारा परिवहन विभाग जिल्ह्यात अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्नही धोकेदायक वाहतूक पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

SCROLL FOR NEXT