Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: बँकेत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दांडीमुळे ग्राहक शेतकरी हैराण; एकटा मॅनेजरच चालवतोय कारभार

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा बँक ऑफ बडोदा येथे पुरेसे कर्मचारी (Nandurbar News) नाही. यामुळे बँकेत येणारे ग्राहक आणि शेतकरी (Farmer) महिलांचे हाल होत आहेत. वेळेवर बँकेचे काम होत नसल्याने तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. (Tajya Batmya)

एकीकडे जिल्हा प्रशासन उष्णघातापासून काळजी घेण्याचे आव्हान करीत आहेत. तर दुसरी ठिकाणी एसी व पंख्‍यात बसून काम करणारे बँकेचे (Bank) काही कर्मचारी दांडी मारत असल्याचे बोलले जात आहे. बँकेत पुरेसे कर्मचारी का नाही? याबाबत बँकेच्या अधिकारी यांना विचारणा करण्यात आल्याने काही कर्मचारी काही कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत. तर उर्वरित कर्मचारी आजारी आहेत असे त्‍यांनी सांगितले. एकाच वेळी एवढे कर्मचारी सोडणे योग्य आहे का? कुठेतरी बँकेचे प्रशासन चुकत असल्याचे दिसून येत आहे. बँकेच्या बाहेर तांत्रिक अडचणीच्या बोर्ड लावले असून आज बँक बंद असल्‍याची अशी सुचना लावली आहे.

खांडबारा गावात मोठी बाजार पेठ आहे. ४० ते ५० खेडेपाड्यांचे ग्राहक व शेतकरी खांडबारा गावात अनेक कामासाठी येतात. तसेच बँक ऑफ बडोदामध्ये घरकुल योजना, बचत गट, शेती कामासाठी असंख्य संख्यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला येतात. परंतु ड्युटीवर असलेले खांडबारा बँक ऑफ बडोदाचे सर्व कर्मचारी गायब असल्याने ग्राहकांना व महिलांना नाहक त्रास होत आहे. खांडबारा बँक ऑफ बडोदा मोठी शाखा असल्याने तीस ते चाळीस खेडेपाड्यातील ग्राहक या बँकेत आर्थिक बँक व्यवहार करण्यासाठी येतात. परंतु आज बँकात फक्त मॅनेजर असून कोणताही कर्मचारी हजार दिसून आला नाही. बँक मॅनेजर यांच्याशी संबंधित विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi News | मोदींचे कटआऊट हटवले, शिवाजी पार्कात जोरदार राडा

Sambhajinagar News : मराठा आरक्षण मिळत नाही, डोक्यावर कर्ज; चिठ्ठी लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकाचं नुकसान होण्याची शक्यता

PM Narendra Modi Property: घर, गाडी, जमिनही नाही! PM मोदींकडे फक्त इतकीच कॅश; एकूण संपत्ती किती?

Hina Khan Post : पीरियड्स आले असताना हिना खानने ४० डिग्री सेल्सियसमध्ये केलं काम; नंतर म्हणाली...

SCROLL FOR NEXT