नंदुरबार : नंदुरबार नगरपालिका मालकीच्या मालमत्तांवर तसेच इतर शैक्षणिक संस्थांवर आकारलेला मालमत्ता कराबाबतचा ठराव एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आला. मात्र सदरचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलाच नसल्याचा दावा माजी आमदार शिरिष चौधरी यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रदेखील प्राप्त झाले आहे. नंदुरबार पालिकेत (Nandurbar Palika) विविध माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी आमदार चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. (nandurbar news Corruption of crores by the authorities regarding tax collection)
पालिकेत सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ३ एप्रिल २०१८ रोजी पालिकेच्या सभेत ठराव क्र. ५ नगरपालिका (Nandurbar) क्षेत्रातील नगरपालिका मालकीच्या मालमत्तांवर तसेच इतर शैक्षणिक संस्थांवर आकारलेला मालमत्ता कराबाबतचा ठराव करण्यात आला. मात्र सदरचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलाच नसून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. पालिका मालकीच्या इमारतींवर घरपट्टी आकारणीचे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. लेखा परीक्षणातही घरपट्टी आकारणीचे नमूद असतांना अद्याप घरपट्टी आकारणी करण्यात आली नाही. सत्ताधाऱ्यांकडे विकासाचे व्हीजन नाही. रोजगार निर्मिती करण्यात आली नाही. केवळ स्वत:च्या परिवार व जवळच्या लोकांच्या हिताचा विचार करण्यात आल्याचा आरोपही चौधरी यांनी केला.
गाव सोडण्याचे वचन पुर्ण करावे
नंदुरबार पालिकेकडून करण्यात येणाऱ्या घरपट्टी वसूली त्याचप्रमाणे पालिका मालकीच्या इमारतींवर कर आकारणी याबाबत पत्रकार परिषदेत माजी आमदार शिरिष चौधरी बोलत होते. घरपट्टीबाबत सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. खरे पाहता नगरपालिका मालकीच्या मालमत्तेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेल्या आव्हानानुसार आम्ही पुरावे सादर केले तर गाव सोडणार असल्याचे वचन आता पूर्ण करावे. असे प्रतिआव्हान देखील माजी आमदार चौधरी यांनी दिले आहे.
पुराव्यानिशी तक्रार करणार
पालिकेने फलकावर प्रकाशित केलेले ३७८ जणांची कर थकबाकीबाबतची नावे देवून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुमारे ३६ कोटींची कर वसुली असतांना त्यातही भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पालिकेत असणाऱ्या गैरकारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असून याची दखल न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आ.चौधरी यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला विरोधी पक्ष गटनेता चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, आनंद माळी, नरेंद्र माळी आदी उपस्थित होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.