Nandurbar News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Nandurbar Student Death: नंदुरबारमध्ये आश्रम शाळेत विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले. औषध पिऊन या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Priya More
  • नंदुरबार आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

  • धडगाव आश्रम शाळेतील धक्कादायक घटना

  • १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ

  • आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा आक्रोश

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबारमध्ये आश्रम शाळेत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अक्राणी अनुदानित आश्रम शाळेत ही घटना घडली. औषध घेतल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी धडगाव रुग्णालयाबाहेर आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अक्राणी अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही धुळे जिल्ह्यातल्या विद्यावाडी येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनुदानित आश्रमशाळा आहे. या आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिने औषध पिऊन आयुष्य संपवलं. औषध प्यायल्यानंतर तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.नंदुरबार आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

नोक्या पावरा असं मृत विद्यार्थिनीचे नाव होते. ती धडगाव तालुक्याती शेलकुई गावाची रहिवासी होती.विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर धडगाव रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आक्रोश केला. या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात खाद्यतेलावर धडक कारवाई

Breast Cancer : महिलांनो ब्रेस्ट दुखणं सामान्य नाही; कॅन्सरचा असू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या ६ लक्षणे?

Sunday Horoscope : देवीच्या कृपेने पैसा वाढवण्याची मोठी संधी मिळेल, ६ राशींनी राहा सावध; वाचा रविवारचे राशीभविष्य

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

SCROLL FOR NEXT