Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: मिरचीची आवक 50 टक्क्यांनी घसरली; दरही झाले कमी

साम टिव्ही ब्युरो

नंदूरबार : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीचे बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या (Nandurbar) नंदुरबार बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) मिरचीची आवक घटली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिरची 50 टक्‍क्‍यांनी विक्रीत घट झाली आहे. (Live Marathi News)

ऑक्टोबर महिन्यापासून या हंगामाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 50 हजार क्विंटल मिरचीची विक्री झाली आहे. मिरचीवर अनेक प्रकारचे रोग आल्यामुळे मिरची पिकात मोठ्या प्रमाणावर घट आल्याचे दिसून येत आहे. याच्या परिणाम मिरची विक्रीवर होताना दिसून येत आहे. मिरचीचा हंगाम जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आवकसोबत दरही कमी

एकीकडे मिरची पिकात घट येत आहेत. तर दुसरीकडे मिरचीच्या भावदेखील खाली आल्याने शेतकरीमध्ये (Farmer) नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीला तीन हजार ते सहा पाचशे पर्यंत भाव मिळत आहे. तर सुकी लाल मिरचीला ८ ते १६ हजार रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. दररोज शंभर ते सव्वाशे वाहनातून दीड ते दोन हजार क्विंटल मिरची विक्री होत आहे. नंदुरबार बाजार समिती नंदुरबार जिल्हा सोबतच शेजारील असलेल्या धुळे जिल्ह्यातून आणि गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात देखील मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे. मात्र मिरचीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

SCROLL FOR NEXT