Crop Insurance Saam tv
महाराष्ट्र

Crop Insurance: मिरची पिकालाही हवे पीक विम्याचे कवच; शेतकऱ्यांची मागणी

Nandurbar News मिरची पिकालाही हवे पीक विम्याचे कवच; शेतकऱ्यांची मागणी

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
:  मिरची पिकाला विमा पिक विमा नसल्याने मिरचीचे झालेल्या नुकसानीचा भरपाई शेतकऱ्यांना (Farmer) मिळत नसते. त्यामुळे अनेक वेळा टाकलेले भांडवलही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडत असतात. मिरची पिकाचा पिक विमा (Crop Insurance) योजनेत समाविष्ट करण्याची मागणी जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (Live Marathi News)

राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात येत असते. दरवर्षी मिरचीचे लागवड क्षेत्र वाढत असले तरी सरकारच्या वतीने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्ती आणि मिरची पिकावर येणाऱ्या विविध विषाणूजन्य आजारांमुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत येत असतात. 

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना द्या आधार 

मागील हंगामात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन झाले असून मिरची तीन लाख क्विंटल उत्पादनाचा टप्पा पार केला होता. मात्र यावर्षी पावसाचे अनियमितता आणि काही प्रमाणात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी सरकार शेतकऱ्यांचे सरकार असे म्हणण्यापेक्षा मिरची सारख्या पिकाचा पिक विमा समाविष्ट करून शेतकऱ्यांना आधार द्यावा; अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT