Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : धडगाव तालुक्यात १३ लाखांचा गांजा जप्त; शेतात करण्यात आली होती लागवड

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात शेतात लागवड केलेल्या मोठ्या प्रमाणात गांजाची शेती आढळून येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या खुटवडा गावातील शिवारातून पोलिसांनी तब्बल १३ लाखांचा गांजा जप्त केलेला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतात धाड टाकत पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात शेतात लागवड केलेल्या मोठ्या प्रमाणात गांजाची शेती आढळून येत आहे. या भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात गांजा व्यसन लागले आहे. सातत्याने कारवाई होत असताना देखील या भागात गांजा कसा उगवला जातो? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वरिष्ठांना कारवाई दाखवण्यासाठी ठराविक ठिकाणी धाड टाकली जाते. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले आहे. त्यानुसारच पुन्हा एकदा १३ लाखांचा गांजा आढळून आला आहे. 

शेत मालक ताब्यात 

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात १३ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. धडगाव तालुक्यातील खुटवडा गावातील शेत शिवरात तब्ब्ल १ क्विंटल गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी हा संपूर्ण माल जप्त केला असून संशयित शेत मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT