अक्षय शिंदे
जालना : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस दल ॲक्शन मोडवर आले आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून विविध गुन्ह्यातील १३ आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
जालना (Jalna) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या आखाड्यात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावं, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी; यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी (Jalna Police) पोलिसांकडून नाकाबंदी करत कारवाई कडक बंदोबस्त करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यात पोलिसांनी १३ आरोपीना तडीपार करण्याची कारवाई केली आहे. तर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत विविध गुन्ह्यांत आरोपी असणाऱ्या ८८९ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.