Vidhan Sabha Election : संभाजीनगर, जळगावमध्ये सापडली मोठी रक्कम; पोलिसांकडून रक्कमेबाबत तपास सुरु

Jalgaon Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील सूतगिरणी परिसरातल्या निवडणूक विभागाच्या तपासणी नाक्यावर ४० लाख रुपयांची रक्कम सापडली आहे.
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Election Saam tv
Published On

संभाजीनगर/ जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहन तपासणी केली जात आहे. या तपासणीत छत्रपती संभाजीनगर व जळगाव शहरात कारमध्ये मोठी रक्कम सापडून आली आहे. पोलिसांकडून सदरची रक्कम जमा करत रक्कम कोणाची याबाबत तपास केला जात आहे. दरम्यान जळगाव शहरात सापडलेली रक्कम बाफना ज्वेलर्सची असल्याने ती परत करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरातील सूतगिरणी परिसरातल्या निवडणूक विभागाच्या तपासणी नाक्यावर ४० लाख रुपयांची रक्कम सापडली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथून सचिन जाधव नावाचा व्यक्ती खाजगी गाडीतून ४० लाख रुपये घेऊन जात असताना स्थिर पथकाकडून तपासणी करण्यात आली. व्यंकटेश संस्थेची ती रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जी व्यक्ती रक्कम घेऊन आला आहे. त्याच्याकडे बँकेकडून कुठलाही क्यूआर कोड जनरेट केला नाही. त्यामुळे ही रक्कम संशयास्पद आहे. म्हणून त्याची निवडणूक विभागाने जप्ती करण्यात आली आहे. आयकर विभागांकडून याची शहानिशा करून या रकमेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Vidhan Sabha Election
Jalgaon News : पाय घसरून नदीत पडल्याने चिमुकलीचा मृत्यू; अंघोळीसाठी गेले असताना घडली घटना

जळगावात सापडली अडीच कोटीची रक्कम 
जळगावात पोलिस नाकाबंदी करून तपासणी करत असताना वाहनात अडीच कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात शनिपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करत असताना अडीच कोटी रुपयाची रक्कम मिळून आली आहे. दरम्यान हि रक्कम आर. सी. बाफना ज्वेलर्सची असून बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना नाकाबंदीत पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. या संदर्भातील पडताळणी करून ही कॅश वैध असून पोलिसांनी रक्कम आर. सी. बाफणा ज्वेलर्सच्या प्रतिनिधींना परत केली आहे. पथकाने ही रक्कम उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतली. 

Vidhan Sabha Election
Sambhajinagar News : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच ठाकरे गटाला मोठी खिंडार; २ माजी नगरसेवकांसह १२ जणांनी दिले राजीनामे

नालासोपार्‍यात एटीएम व्हॅनमध्ये आढळले साडेतीन कोटी
वसई : नालासोपारा एसटी आगाराजवळ गुरूवारी दुपारी एका एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपयांची रोकड आढळली आहे. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने ही रोकड असलेली व्हॅन जप्त केली असून एवढी रक्कम कुणासाठी आणली त्याची चौकशी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com