Nandurbar Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Bus Accident: दुचाकीला वाचविण्यात बस खोल नाल्यात; धडगाव– शहादा रस्‍त्‍यावर अपघात

दुचाकीला वाचविण्यात बस खोल नाल्यात; धडगाव– शहादा रस्‍त्‍यावर अपघात

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसला नंदुरबारमध्‍ये अपघात झाला आहे. वळण रस्‍त्‍यावर दुचाकीला वाचविण्याच्‍या (Nandurbar News) प्रयत्‍नात बस खोल नाल्‍यात पडली आहे. यात जीवितहानी झाली नसल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Maharashtra News)

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या नंदुरबार विभागाच्‍या बसचा धडगाव ते शहादा रस्त्यावर काकरदा गावाजवळ देवबारी घाटात हा (Accident) अपघात आज सायंकाळी झाला. घाट रस्‍ता असल्‍याने वळणावर समोरून येत असलेले वाहन दिसत नाही. यात देवबारी घाटातील वळण रस्‍त्‍यावर समोरून अचानक दुचाकी आली. या दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्‍न बस चालकाने केला. यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्‍याने बस खोली नाल्‍यात गेली.

मदतकार्य सुरू

प्रवाशांना घेवून जात असलेली बस खोल नाल्यात उतरल्याने अपघात झाला आहे. या अपघातात कुणी जखमी नसल्याची प्राथमिक माहिती प्राप्‍त झाली आहे. बसचा अपघात झाल्‍याचे समजताच प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सध्‍या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

धक्कादायक! कागदोपत्रीच शाळा… ४० शिक्षकांची फसवणूक, हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Vedika Karkal: १८व्या वर्षी मिस गोवा; कन्नड, कोकणी चित्रपटातून ब्रेक; कोण आहे वेदिका करकल?

ठाकरेंचे २ खासदार अचानक शिंदेंच्या खासदाराच्या घरी, नेमकं कारण काय? राज्यात भूकंप होणार?

Crime News: बायको अश्लील व्हिडीओ पाठवतेय आणि..., पत्नीच्या विचित्र मागणीमुळे नवरा हैराण, थेट पोलीस ठाण्यात पोहचला

SCROLL FOR NEXT