Nagpur Politics: नागपुरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप उमेदवाराला घरात कोंडलं; पाहा VIDEO

BJP Workers Lock Candidate at Home: भाजपच्या उमेदवाराला घरामध्ये कोंडून ठेवल्याची घटना नागपुरमध्ये घडली. उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी या उमेदवाराला घरामध्येच कोंडून ठेवलं.
Nagpur Politics: नागपुरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप उमेदवाराला घरात कोंडलं; पाहा VIDEO
BJP Workers Lock Candidate at HomeSaam Tv
Published On

Summary -

  • नागपूर महापालिका निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा

  • भाजप उमेदवार किसन गावंडे यांना घरात कोंडले

  • एबी फॉर्मवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद

  • उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांना घरात कोंडले

पराग ढोबळे, नागपूर

नागपूर महानगर पालिका निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी भाजपच्या उमेदवाराला घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. नागपूरमधील भाजपचे उमेदवार किसन गावडे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेऊ नये यासाठी आता राज्यभरात वेगवेगळे ड्रामा केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बंडखोरी केलेल्या अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी प्रयत्न केले जात आहे.

भाजपकडून ६ उमेदवारांना २ एबी फॉर्म देण्यात आले होते. नागपूरमधील प्रभाग क्रमांक १३ (ड) मधील किसन गावंडे आणि विजय होले या दोन व्यक्तींना एबी फॉर्म देण्यात आले होते. आता पक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत की किसन गावंडे यांना माघार घ्यावी आणि आपला एबी फॉर्म परत घ्यावा. त्यामुळे याठिकाणी विजय होले हे उमदेवार कायम राहतील. अशात किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घरात कोंडून ठेवले. किसन गावंडे यांच्या घराच्या दरवाजाला टाळा लावण्यात आला.

Nagpur Politics: नागपुरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप उमेदवाराला घरात कोंडलं; पाहा VIDEO
BJP : भाजपच्या निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये राडा, नाराजांना हटवण्यासाठी पोलीस दाखल, पाहा व्हिडिओ

किसन गावंडे यांनी ⁠उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी आणि समर्थकांनी त्यांना घरात बंद केलं. किसन गावंडे यांनी घराबाहेर पडू नये यासाठी त्यांनी थेट दाराला कुलूप लावून टाकले. किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी केली. किसन गावंडे यांना भाजपने उमेदवारी मागे घेण्यासा सांगितली. आता किसन गावंडे यांचा भाजपने दिलेला एबी फॉर्म रद्द झाला. ते आता अपक्ष उमेदवार आहेत.

Nagpur Politics: नागपुरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप उमेदवाराला घरात कोंडलं; पाहा VIDEO
Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com