Sambhajingar Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, ३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

Samruddhi Expressway Bus Accident : समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसला समोरून ट्रकने धडक दिल्यानंतर भीषण आग लागली. या बसमधून ३२ जण प्रवास करत असताना १ जणाचा मृत्यू, १ प्रवासी जखमी झाला आहे.
Sambhajingar Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, ३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट
Samruddhi Expressway Bus AccidentSaam Tv
Published On
Summary
  • समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक

  • धडकेनंतर भारत बेंझ बसला भीषण आग

  • ३२ जण प्रवासात; १ मृत्यू, १जखमी

  • माळीवाडा पोलिसांचा तपास सुरू

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र कायम असताना आज पुन्हा एकदा मोठा अपघात घडला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ४६३ वर एका प्रवासी बसला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण ३२ जण प्रवास करत होते, त्यामध्ये २९ प्रवासी, २ ड्रायव्हर आणि १ कंडक्टरचा समावेश होता. या दुर्घटनेत एक प्रवासी जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर माळीवाडा टोलनाक्यापासून सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ४६३ वर साईराम ट्रॅव्हल्सच्या भारत बेंझ या प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार समोरील ट्रकला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला असून त्यानंतर बसने पेट घेतला.

Sambhajingar Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, ३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट
Raigad : नववर्षाच्या स्वागताला कोकणात पर्यटकांची गर्दी! 'या' प्रमुख मार्गांवर वाहतुकीत मोठा बदल; वाचा, कसे असेल नियोजन?

या बसमध्ये एकूण ३२ जण प्रवास करत होते, त्यामध्ये २९ प्रवासी, २ ड्रायव्हर आणि १ कंडक्टरचा समावेश होता. या दुर्घटनेत एक प्रवासी जखमी झाला असून अमोल सुरेश शेलकर (वय ३८, रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी श. अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदमपुरा व कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Sambhajingar Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, ३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट
Weather Alert : नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस, मुंबईसह अनेक भागांत कोसळल्या सरी; गारठा कायम राहण्याचा अंदाज

अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली. या कारवाईत उप अग्निशमन केंद्र अधिकारी . विनायक कदम, ड्युटी अधिकारी तसेच अग्निशामक जवान व वाहन चालकांनी सहभाग घेतला. वाहनाच्या नुकसानीची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास माळीवाडा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com