महाराष्ट्र

Nandurbar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पुतळ्याचे दहन; भाजपकडून आघाडी सरकारचा निषेध

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पुतळ्याचे दहन; भाजपकडून आघाडी सरकारचा निषेध

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मुख्य चौकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पुतळ्याचे दहन करून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा निषेध करण्यात आला. (nandurbar burning of the statue underworld don Dawud BJP protests against the state government)

देशद्रोही दाऊद इब्राहिम प्रेरित महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करून अटक केल्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी (BJP) निषेध करत आहे.

जनतेचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ

राज्यात एसटी कर्मचारी तसेच रोजगार, मजूर कष्टकरी यांचे मोठे प्रश्न असतानाही महाविकास आघाडी सरकारमधील दोषी मंत्र्यांना अटक केल्यानंतर रस्त्यावर येतात हे दुर्दैव आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरूंगात आहे. महा विकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरत आहे. याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

SCROLL FOR NEXT