Nandurbar News Saam Tv
महाराष्ट्र

मुलांनो खांद्यावर बसून नदी पार करा अन् शाळेत जा...सरकार आपलं ऐकणार नाही!

अतिवृष्टी वाहून गेलेल्या पूलाची अद्याप दुरुस्ती नाही; पूला मुळे दहा गावांचा संपर्क तुटला होता...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - नवापूर (Navapur) तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ अतिवृष्टीत मातीचा पूल वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला होता. पावसाचे (Rain) जोर कमी झाल्यानंतरही प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून नदीच्या प्रवाहातून मार्ग काढावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालक मुलांना खांद्यावर बसवून नदी पार करून शाळेत पाठवत आहे. पूल वाहून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी, अधिकारी पाहणी करून फोटो काढून निघून गेले.

हे देखील पाहा -

परंतु अद्याप दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खांद्यावर बसा अन् शाळेत जा सरकार काही ऐकणार नाही असंच काही पालकांना आपल्या पाल्याला म्हणावं लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सातपुडा पर्वतरांगेसह नवापूर तालुक्यात पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक गावांचे फरशी पूल तुटून दळणवळणाची सोय बंद झाली आहे. दुर्गम भागात डोंगरदर्‍याचे रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासन पोहोचले आहे.

मात्र सपाटी भागात नवापूर तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ पाहणी करून गायब झाल्याचे चित्र आहे. निमदर्डा गावाजवळ गेल्या उन्हाळ्यात मोठ्या पुलाचे काम सुरू होते. मात्र ठेकेदाराकडून अर्धवट स्थितीत काम बंद केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दहा गावातील नागरिकांना रहदारीसाठी तात्पुरत्या स्वरूपात का होईना सोय उपलब्ध करावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT