Taloda Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : साडेसहा लाखांची लाच ग्रामसेवक ताब्यात; नंदुरबार एसीबीची कारवाई

Nandurbar News : ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे अशी विविध आठ प्रकारची मंजूर विकासकामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत.

Rajesh Sonwane

तळोदा (नंदुरबार) : गावाच्या विकासकामांचे बिल अदा करण्यासाठी अक्कलकुवा पंचायत समितींतर्गत (Nandurbar) असलेल्या ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली. ६ लाख ४७ हजार रुपयांची लाच मनोज पावरा (रा. दामोदरनगर, तळोदा) (Taloda) या ग्रामसेवकास नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला. (Live Marathi News)

सिंदुरी (ता. अक्कलकुवा) येथे महिला सरपंच आहे. दरम्यान ग्रामपंचायतीवर (Gram Panchayat) शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे अशी विविध आठ प्रकारची मंजूर विकासकामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत. सदरची कामे पूर्ण झाल्यावर कामांसाठीचे ३२ लाख ३४ हजार रुपये ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडून आले आहे. मात्र, या कामांच्या बिलाचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामसेवक व खासगी व्यक्ती यांनी बिलाच्या रकमेच्या २० टक्के रक्कमेची (Bribe) मागणी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामसेवकाने सहा लाख ४७ हजार रुपये लाचेची मागणी करीत सदर रक्कम पंच व साक्षीदारांसमक्ष स्वीकारली. याचवेळी (ACB) एसीबीच्या पथकाने ग्रामसेवकास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या पथकाने केली. ग्रामसेवकास ७ फेब्रुवारीला तळोदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT