Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Mahayuti : नंदुरबारमध्ये महायुतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप

Nandurbar News : नंदुरबार भाजप आमदार विजयकुमार गावित व शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील हा वाद आहे. यापूर्वी देखील दोन्ही आमदारांनी एकमेकांवर आरोप केले होते यानंतर दोघांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे आमदार यांनी शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणूका लक्षात घेता हा वाद कितपत पेटतो कि वरिष्ठ स्तरावरून समेट घडविली जाईल; हे पाहणे महत्वाचे राहील.  

नंदुरबार भाजप आमदार विजयकुमार गावित व शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील हा वाद आहे. यापूर्वी देखील दोन्ही आमदारांनी एकमेकांवर आरोप केले होते. यानंतर दोघांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आदिवासींच्या जमिनी हडप करत असल्याच्या आरोप केला आहे. 

निवडणुकीत महायुतीला कधीच मदत नाही 

तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी हे नेहमी विकासाच्या योजना बंद पाडण्यात आग्रही राहत असतात. इतकंच नव्हे तर गोरगरिबांनी आदिवासींच्या जमीन हडप करण्याचे पाप हे करत आहे. ज्यावेळेस विकासाच्या चांगल्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यावेळेस महायुती दिसते. परंतु निवडणुकीसाठी महायुतीला कधीच मदत करत नाही; असा देखील गंभीर आरोप डॉ. गावित यांनी केला आहे. 

अनेक वर्षांपासूनचा वाद 

दरम्यान डॉ. गावित आणि रघुवंशी यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. जिल्ह्यात महायुतीचे आमदाराची एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप एकमेकांवर करत असून, विजयकुमार गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर जमीन आणि महाविद्यालय हडप करण्याच्या आरोप केला आहे. त्यामुळे या आरोपाला आता चंद्रकांत रघुवंशी कशा पद्धतीने उत्तर देता हे पाहणं महत्त्वाच्या ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेत्याला खडसावलं! नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Sneezing : वारंवार शिंका येतात? 'हे' घरगुती उपाय येतील कामी, मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT