Nandurbar Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: पाच हजाराहून अधिक वनहक्क दावेदारांचा पायी बिऱ्हाड मोर्चा

पाच हजाराहून अधिक वन हक्क दावेदारांचा पायी बिऱ्हाड मोर्चा

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून ५० किलोमीटर लांब अंतर नंदुरबार येथे निघालेला पायी बिऱ्हाड मोर्चा आज नंदुरबार शहरात दाखल झाला. जवळपास पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदार शेतकरी (Farmer) या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे. (Nandurbar news Birhad Morcha of more than five thousand forest rights claimants)

वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी; या मागणीसाठी हजारो पुरुष व महिला शेतकरी आपल्या डोक्यावर आपले बिर्‍हाड घेऊन नंदुरबार (Nandurbar) शहरात दाखल झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस (Police) दलाच्या वतीने मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासमोरील सुभाष चौकात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेनंतर मोर्चेकरी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे (Nandurbar Collector Office) कूच करणार आहे.

पंधरा वर्षांपासून अंमलबजावणी नाही

गेल्या पंधरा वर्षापासून वनहक्क कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कोरोनाचा धाक दाखवून घरात कोंडून सर्वात जास्त वनहक्क दावेदारांचे निकाल अपात्र ठरवले आहे. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी चर्चेला ही वेळ देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाच हजार पेक्षा अधिक संख्येने पन्नास किलोमीटर लांब पायी बिर्‍हाड मोर्चा काढून धडक दिली आहे. यावर आता प्रशासन काय भूमिका घेणार तसेच प्रशासनाने मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास मोर्चेकरी काय पाऊल उचलतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

SCROLL FOR NEXT