Nandurbar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News: बॅकअप चाबी मिळवत एटीएममधून उडवले ६२ लाख; कर्मचाऱ्यांनेच केला कारनामा

बॅकअप चाबी मिळवत एटीएममधून उडवले ६२ लाख; कर्मचाऱ्यांनेच केला कारनामा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे

नंदुरबार : एटीएम उघडण्याची एक्स्ट्रा बॅकअप चावी मिळवून एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्याने विविध एटीएममधून (ATM) रक्कम काढत तब्बल 62 लाख 91 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Live Marathi News)

एटीएममध्ये पैसे भरण्याचे आदेश नसतांना बॅकअपची चावी स्वत:जवळ ठेवून (Nandurbar) नंदुरबार आणि नवापूर येथील एटीएममधून रक्कम काढून आणि बँकेने (Bank) एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम हडप (Crime) केली आहे. ही घटना 5 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. याबाबत राहूल प्रभाकर मानकर यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चावी परत केलीच नाही

नंदुरबार येथील भाट गल्लीत राहणारा पंकज किशोर चौधरी हा सीएमएस इन्फोसिस्टीम लिमीटेड कंपनीचा अधिकृत कर्मचारी आहे. कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे एटीएमध्ये पैसे भरण्याचे आदेश नसतांना पंकज चौधरी याने कंपनीकडून एक्स्ट्रा बॅकअप चावी मिळवून घेतली. एटीएम उघडण्याची एक्स्ट्रा बॅकअप चावी कंपनीस परत न करता त्याने स्वत:कडे ठेवून घेतली.

पाच एटीएममधून काढली रक्‍कम

एक्स्ट्रा बॅकअप चावी असल्याचा फायदा घेत पंकज चौधरी याने नंदुरबार शहरातील मिराज सिनेमा इमारतीमधील एसबीआयच्या एटीएममधून 16 लाख रुपये, सिंधी कॉलनीतील एबीआयच्या एटीएममधून 21 लाख 99 हजार 500 रुपये, नवापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममधून 10 लाख रुपये, नवापूरातील युनियन बँक ऑफ इंडीयाचा एटीएममधून 9 लाख 92 हजार रुपये, नवापूर तालुक्यातील रायंगण येथील एसबीआयच्या एटीएम मशिनमधून 5 लाख रुपये अशा पाच ठिकाणच्या एटीएममधून रक्कम काढून तब्बल 62 लाख 91 हजार 500 रुपयांची रोकड घेवून अपहार केला. तसेच बॅकेने एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम देखील मशिनमध्ये न भरता स्वत: वापरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

Big Boss 19: 'बिग बॉस १९'च्या घरात 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या अभिनेत्याची एन्ट्री; हे १२ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब

Red Carpet: फक्त सेलिब्रिटी किंवा खास लोकांचे स्वागत करण्यासाठीच रेड कार्पेट का घालतो?

SCROLL FOR NEXT