Uday Samant : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नावाने फसवणूक; नोकरीचे आमिष दाखवत केली लाखोंची लूट

ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महिलेने एका दाम्पत्याकडून २० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Uday Samant
Uday SamantSaam TV

माधव सावरगावे

Uday Samant : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नावाने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका महीलेविरोधात औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झालाय. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम माझा मुलगा पाहतो. त्याच्याकडून खात्रीशीर काम होऊ शकते, अशी थाप मारून ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महिलेने एका दाम्पत्याकडून २० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Uday Samant News)

नोकरी लावून देणार असा करारनामा १०० रुपयांच्या बॉण्डवर लिहून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात महिलेच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. सुरेखा विवेक काटे असे आरोपी महिलेचे नाव आहे.

एमआयडीसी क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेखाने १६ सप्टेंबर रोजी दीपाली संदीप कुलकर्णी आणि संदीप कमलाकर कुलकर्णी दाम्पत्याच्या भाच्यास उद्योग विभागात नोकरी (Job) लावण्याचे आमिष दाखवले. सुरेखाचा मुलगा केदार हा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम पाहत असल्याची बतावणी सुरेखाने केली. त्यामुळे कुलकर्णी दाम्पत्याने सुरेखाला नोकरीसाठी २५ लाख रुपये देण्याचे ठरविले.

त्यासाठी सुरेखाने १६ सप्टेंबररोजी रोख २० लाख रुपये आणि उर्वरित ५ लाख रुपये नोकरीची ऑर्डर मिळाल्यानंतर घेण्याचा करारनामा १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर केला. त्यानुसार, कुलकर्णी दाम्पत्याने सुरेखाला २० लाख रुपये रोख दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या नावाने कोणीतरी महिला पैसे उकळत असल्याची माहिती मंगळवारी नागपूर (Nagpur) येथील विधिमंडळात समजली. त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुरेखा काटेच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, अशोक रसाळ यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार तक्रार नोंदविली आहे. सदर घटनेत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com