Nandurbar Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Bajar Samiti : बाजार समितीत मिरचीची विक्रमी आवक; भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी उलाढाल झाली आहे. (Nandurbar) मात्र मिरचीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादक (Farmer) शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Maharashtra News)

नंदुरबार बाजार समितीत आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली असून पुढील दीड महिना मिरचीची आवक सुरू राहण्याचे अंदाज मार्केट कमिटी द्वारा (Bajar Samiti) व्यक्त करण्यात आले असून आणखीन लाख एक लाख ते सव्वा लाखपर्यंत मिरचीची आवक होणार असल्याचे बोलले जात आहे. मिरचीची आवक जास्त असल्यामुळे मिरचीचे भाव घसरले आहे. तसेच वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे आणि मिरची पथार्‍यांवरती पाथरण्यासाठी जागा शिल्लक उरल्या नसल्यामुळे व्यापारी देखील मिरची खरेदीसाठी कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिरची पावडरला अधिक भाव  

मागील वर्षी जो मिरची ८ हजार पर्यंत विकली गेली होती. त्याच मालाला यावर्षी दोन ते चार हजारपर्यंतच्या भाव मिळत असल्याने शेतकरी देखील नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. मिरचीपासून तयार केले जाणारे पावडरच्या किंमतीत प्रचंड अशी वाढ झाली असून मात्र शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सव्वा दोन लाख क्विंटल आवक 
नंदुरबार बाजार समितीत मागील आठ वर्षाच्या रिपोर्ट यावर्षी तुटणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात असून ओली लाल मिरचीला २ हजारपासून ४ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. तसेच बाजार समितीत २०० ते ३०० वाहनातून मिरचीची आवक होत आहे. बाजार समितीत यावर्षी विक्रमी अशी आवक झाली असून आतापर्यंत नंदुरबार बाजार समितीत २ लाख २५ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. मार्चपर्यंत ही आवक सुरू राहणार असून यावर्षी तीन लाख क्विंटल मिरचीच्या टप्पा नंदुरबार बाजार समिती ओलांडणार आहे.   यावर्षी उत्पन्न जास्त असल्यामुळे आणि आवक जास्त येत असल्यामुळे मिरचीला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT