सागर निकवाडे
नंदुरबार : जग आत्याधुनिक युगाकडे वळत असताना ग्रामीण भागात काही परंपरा अद्यापही सुरूच आहेत. त्यातीलच एक परंपरा म्हणजे शेतात सालगडी म्हणून निवडण्याची अनोखी परंपरा आहे. नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात अक्षय तृतीयेच्या दिवशी सव्वा मन सुमारे ९० किलो दगड उचलण्याची वर्षानुवर्षांची परंपरा जोडली गेली आहे. हा दगड जो सालदार म्हणजे शेतात काम करणारा उचलेल त्याला सर्वाधिक वर्षाचा दाम दिला जातो. जे अयशस्वी झाले त्याला देखील काम मिळते; परंतु त्याचा दाम त्याच्या योग्यतेनुसार दिला जात असे.
आजच्या यांत्रिकरण आणि आधुनिक युगात कंपन्यांकडून एखाद्या कर्मचाऱ्याला नियुक्ती करताना त्याचे वर्षभराचे पॅकेज दिले जाते. त्याच नुसार सालदार निवडीसाठी पूर्वी दगड उचलण्याची परंपरा आहे. हि परंपरा अजूनही बहुतेक जुन्या जाणत्यांनी सुरूच आहेत. सालदारने शेतात काम करणारा दगड उचलून आपली योग्यता साबित करण्याची ही परंपरा होती. साधारण या दगडाचे वजन सव्वा मण असल्याचे जुनेजाणते सांगतात. शेतीची कामे करण्यासाठी जो शेतगडी असतो; त्याची खानदेशात अक्षय तृतीयेला निवड केली जाते. नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात सालगडी ठरविण्याची वेगळी पद्धत वर्षोनावर्षं जोपसली जात आहे.
६० हजार रुपयांपासून पॅकेज
एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत कामगारांची नियुक्ती करतांना त्याच्या अनुभव आणि अनेक चाचण्या घेतल्या जात असतात. त्याच प्रमाणे शेतात वर्षभर राबणाऱ्या गड्याची नियुक्ती करतांना वर्षभराचा पगार म्हणजे साल ठरविण्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्त निवडला जातो. गड्याचे साल ठरवितांना त्याची ताकद आणि चिकाटी पहिली जाते. नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात गड्याची निवड करण्यासाठी या भागातील चौकात असेल्या दोन मोठ्या दगडांची पूजा केली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी आलेले तरुण या गोट्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात. जे तरुण हे गोटे उचलतात, मग त्याच्या वर्षाचा पगार ठरविण्याची लगबग सुरु होते. यावर्षी सालदारांचे वर्षभराचे पॅकेज ६० हजारापासून ते एक लाख १० हजार रुपयापर्यत ठरत आहेत. त्याच सोबत त्याला कपड्याचे दोन जोड आणि दोन पोते धान्य दिले जाते.
शेत मालकाकडून साल ठरविल्यानंतर सालदाराला अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचा मानपान केला जात असतो. त्याच नवीन वस्त्र दिले जातात. त्याचप्रमाणे सालदार व त्याच्या परिवाराला पुरणपोळीचे जेवण घर मालकाकडून खाऊ घातले जाते. त्याचबरोबर त्याला ठरविण्यात आलेल्या साल पॅकेजच्या रकमेपैकी काही रक्कम ॲडव्हान्स दिली जाते. तो सालदार वर्षभरासाठी शेख मालकाचा बांधील होत असतो.
असा असतो सालदाराचा दिनक्रम
अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवसापासून शेत मालकाच्या घरी सकाळी सहा वाजेपासून गाय, म्हैस व बैलांना चारा घालणे व पाणी पाण्याचा कामापासून दिवसभराची सुरुवात होत असते. त्यानंतर घर मालकीण इकडून सालदाराला (शेतात काम करणारा) चहा व नाष्टा दिला जात असतो. त्यानंतर सालदार शेतात जाऊन शेतातले काम करतो. तर मालक त्याच्या जेवणाचा डबा घेऊन दुपारपर्यंत शेतात जाऊन देत असतो. सायंकाळी परत शेतात मालकाच्या घरी आल्यानंतर ढोरांना तारा खाऊ घातल्यानंतर शेत मालकीण त्यास चहा देऊन त्याची सुट्टी केली जात असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.