Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: खाजगी प्रवासी जीपची दुचाकीला धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी

खाजगी प्रवासी जीपची दुचाकीला धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी

दिनू गावित

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील गेंदाहून धडगावकडे येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहन जीप गाडीने बिलगाव खर्डी गावाजवळ स्कुटीला जोरदार (Accident) धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की जीप गाडीने स्कुटी चालकाला धडक दिल्यानंतर स्कुटी वाहन थेट चार चाकी वाहनाच्या खालून फरपटत नेल्याने (Nandurbar) चक्काचूर झाले आहे. यात स्‍कुटी चालक गंभीर जखमी झाला आहे. (Nandurbar Accident News)

प्रत्यक्ष दर्शींच्या माहितीनुसार दुर्गम भागातील अति तीव्र वळण रस्त्यावरील झाडाझुडपांमुळे समोरून येणारी गाडी न दिसल्याने अपघात (Accident News) घडल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. अपघातातील विचित्र प्रकार म्हणजे जीप गाडीच्यावर बसलेले चार ते पाच प्रवासी प्रवासी अपघातानंतर खाली कुदल्याने किरकोळ जखमी झाले आहे. तर स्‍कुटी चालक सिंग्या पावरा (रा. राजबर्डी) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी हलविण्यात आले आहे. स्थानिक नागरिक व प्रवासी यांनी अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले.

रोजचा जीवघेणा प्रवास

धडगाव ते बिलगाव दरम्यान परिवहन विभागाची दिवसभरातून एकच बसफेरी असल्याने गेंदा, माल, भूषा, सावर्यादिगर, बमाना या गावातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. दोऱ्या खोऱ्यातील वळण अति तीव्र उतार रस्त्यांमध्ये झाडाझुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी आपली वाहने सावकाश चालवून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: हुशार अन् चतूर महिलांमध्ये असतात हे ७ सीक्रेट, नाव कमावण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Banana Muffins Recipe : ख्रिसमस स्पेशल बनाना मफिन्स, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडतील

नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; तरुण जोडप्याला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: काँग्रेसची उद्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक असणार

Nandurbar Crime: शिक्षकी पेशाला काळीमा! आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून बलात्कार

SCROLL FOR NEXT