Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: चांदसैली घाटात अपघात; चालकाच्‍या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना, ७ प्रवाशी जखमी

चांदसैली घाटात अपघात; चालकाच्‍या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना, ७ प्रवाशी जखमी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात आज प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनाचा अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्‍याने (Accident) अपघात झाल्‍याचे सांगितले (Nandurbar) जात आहे. यात सात जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्‍ह्यातील चांदसैली घाटावर धोक्‍याचे वळण आहेत. याच घाटात प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहन धडगाववरून तळोद्याकडे येत होते. या दरम्‍यान घाटातील वळण रस्त्याजवळ वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट घाटातील दगडावर धडकले. यात प्रवास करत असलेले सात प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींवर तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करुन सोडून देण्यात आले.

मोठी दुर्घटना टळली

सुदैवाने बाजुला दरी असतांना वाहन चालकाने प्रसंगावधानता दाखवत विरुद्ध दिशेला वाहनाला वळवत मोठ्या दगडाला धडक मारली. अन्‍यथा वाहन खोल दरीत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. यात मोठी जीवितहानी होण्याची देखील शक्‍यता होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : 'मोहब्बत हो गई...'; गाण्यावर शिवाली परब बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Ratnagiri : चिपळूणमध्ये भयंकर अपघात, पावसात थारने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

कोसळधार! राज्यात पावसाचे ७ बळी; मराठवाड्यात ११ जण बेपत्ता, कुठे कशी परिस्थिती?

Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

SCROLL FOR NEXT