Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी ८ कोटींचा निधी; धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात होणार उद्योग

Nandurbar News : कैरीवर प्रक्रिया करून त्याचे आमचुल तयार करण्यात येत असते. त्यामुळे स्थानिक आदिवासी नागरिकांना या आमचूर प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतो

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावरान कैरीचे (Nandurbar) उत्पादन घेतलं जात असते. यामुळे कैरीपासून आमचूर तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग आवश्यक आहे. याच प्रक्रिया उद्योगासाठी दोन्ही तालुक्यांना ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

कैरीवर प्रक्रिया करून त्याचे आमचुल तयार करण्यात येत असते. त्यामुळे स्थानिक आदिवासी नागरिकांना या आमचूर प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्याने स्थानिक पातळीवर कच्चा माल विक्री करावा लागत होता. आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा; यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यात प्रत्येक तालुक्यात आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचा प्रयत्न सुरु होता. 

मंत्री गावित यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आमचूल प्रक्रिया उद्योगांसाठी या दोनही तालुक्यांसाठी सुमारे सव्वा आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी मंजुरीमुळे दोन्ही तालुक्यात उद्योग सुरु होतील. यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना याचा मोठा लाभ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp चं नवं फीचर! आता चॅट बॅकअपसह प्रायव्हेट मेसेज अन् व्हिडिओ राहणार सुरक्षित; आताच करा हे काम

Maharashtra Live News Update: महिला अधिकाऱ्याच्या छळामुळे पत्नीचा मृत्यू, पतीचा आरोप

Rohit Aary Encounter: एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्यचे व्हॉट्सअप चॅट समोर, मराठी अभिनेत्रींशी संपर्क अन्...

Ind Vs Aus T20 : गिल, सॅमसन, कर्णधार सूर्यकुमार, तिलक; ऑस्ट्रेलियाचे भारताला एकापाठोपाठ ४ धक्के

संजय राऊतांची प्रकृती गंभीर; २ महिने राजकारणापासून दूर, सत्याचा मोर्चालाही जाणार नाहीत, नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT