Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : बेमुदत उपोषणाला बसलेल्या ६५ वर्षीय गुलाब मराठेंचे प्रकृती खालावली; जरांगे पाटलांना पाठिंबा

Nandurbar News : बेमुदत उपोषणाला बसलेल्या ६५ वर्षीय गुलाब मराठेंचे प्रकृती खालावली; जरांगे पाटलांना पाठिंबा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला (Maratha Aarkshan) राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. यात (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील ६५ वर्षीय गुलाब मराठे हे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे.  (Live Marathi News)

नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील गुलाबराव मराठे हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावात आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणासाठी असलेल्या लढ्यात आपण योगदान देत असून पाटील यांचे उपोषणाला पाठिंबा देत मराठे यांनीही बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वैद्यकीय पथकाच्यावतीने त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात येत असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज असल्याचे महत्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गावात जाऊन अनेकांनी दिला पाठिंबा 

तर दुसरीकडे गुलाबराव मराठे यांच्या आंदोलनाला नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाजाच्यावतीने मोठा पाठिंबा मिळत असून समाज बांधवांनी उमर्दे गावाला भेटी देत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूजमध्ये तासभरापासून EVM बंद

Amboli Recipe: मऊ लुसलुशीत आंबोळी रेसिपी कशी बनवायची ?

Sanchar Saathi: ना डिलिट होणार, ना डिसेबल; सरकार तुमच्या फोनमध्ये करणार अ‍ॅप इन्स्टॉल; नेमका प्लान आहे तरी काय?

Taj Mahal: कोणाच्या जमिनीवर बांधला गेल्या ताजमहाल? पाहा कोण होचं जमिनीचा मालक?

Pune Police : वाहतूक कोंडीची कटकट मिटवण्यासाठी थेट आयुक्त रस्त्यावर उतरले, भल्यापहाटे घेतला आढावा

SCROLL FOR NEXT