Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: पंधरा तपासणी नाक्‍यांवर २४ तास पोलिसांचा पहारा; आंतरराज्य चेक पोस्ट, शहराच्या प्रवेश ठिकाणावर वाहनांची होणार तपासणी

पंधरा तपासणी नाक्‍यांवर २४ तास पोलिसांचा पहारा; आंतरराज्य चेक पोस्ट, शहराच्या प्रवेश ठिकाणावर वाहनांची होणार तपासणी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्हा हा गुजरात, मध्य प्रदेश राज्यांचा सीमावरती भागात आहे. या दोघी राज्यांच्या सीमा आणि लागून असलेल्या धुळे (Dhule) जिल्ह्याची सीमा असल्याने सीमावरती भागातून गुजरात (Gujrat) राज्यात होणारी तस्करी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तसेच आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या काळातील कायदा सुव्यवस्था अबाधित रखण्यासाठी (Nandurbar) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पंधरा ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले असून या चेक पोस्टवर आठ अधिकारी आणि ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

गुजरात राज्यात असलेली दारूबंदी आणि महाराष्ट्रात असलेली गुटका बंदी. त्याच्यासोबत आगामी काळात येणाऱ्या सण उत्सव तसेच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता सीमावरती भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने अधिक दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संशयित वाहनांची तपासणी करत संशयित नागरिकांची ही तपासणी केली जात आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यातील गुजरात, मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्याच्या सीमा वरती भागात १५ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून या ठिकाणी २४ तास पोलीस कर्मचारी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करणार आहे. वाहनांची तपासणी करत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. याची काळजी पोलीस दलाच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LalbaugCha Raja: लालबागच्या राजासमोर भाविकांवर सुरक्षा रक्षकांची मुजोरी! खांद्यावर लेक घेऊन आलेल्या भक्ताला धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: नैसर्गिक सुंदरता अन् शांत वातावरण; महाराष्ट्रातील 'या' सुंदर ठिकाणी कधी गेलात का? एकदा भेट द्याच

Maharashtra Live News Update: : परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजाचे आमरण उपोषण

संतापजनक! गोड बोलून फ्लॅटमध्ये नेलं अन्...; वाढदिवसाच्या रात्री महिलेसोबत घडलं भयंकर

Beed News: बीडमध्ये दोन गट आमने-सामने; एका गटाकडून वाल्मिक कराडच्या नावाने घोषणाबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT