बुलढाणा : मेहकर तालुक्यातील घाटबोरी वनविभागात १७० झाडे तोडण्यासाठी परवानगी घेऊन ६१३ सागवान झाडांची कत्तल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास (Amaravati) अमरावतीच्या वन विभागाकडे (Forest Department) गेला आहे. घाटबोरी येथील वनरक्षक निलंबित करण्यात आले असून, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. (Tajya Batmya)
घाटबोरी येथील वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात सागवानाची अवैधपणे कत्तल होत असल्याच्या अनेक तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या होत्या. याकडे वनविभाग दुर्लक्ष करित होते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेशवर टाले यांनी ही बाब लक्षात आणून स्वतः उपवनसंरक्षण अधिकारीसह घाटबोरी येथील जंगलात जाऊन पाहणी केली असता हजारो सागवान या झाडांची कत्तल झाल्याचे दिसून आली. चौकशी करून दोषी महिला वनरक्षक यांना तात्काल निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान शुक्रवारी अमरावती येथील वन विभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाटबोरी वनपरिसराची पाहणी केल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली. कारवाई झालेल्या वनरक्षकासह वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. घाटबोरी वनपरिक्षेत्रात सागवान अवैद्य वृक्षतोडी सोबतच गौनखनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे. घाटबोरी येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नेहमीच अवैध वृक्षतोड करणाऱ्यांकडे दुर्लक्ष दिसून येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.