Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News : शहादा तालुक्यातून २१ लाखांचा गांजा जप्त; शेतात पिकांमध्ये करण्यात आली होती लागवड

Nandurbar News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलिसांकडून करण्यात आलेली हि कारवाई मोठी मानली जात आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: धुळे, नंदुरबार जिल्ह्यात गांजा जप्तीच्या कारवाया सातत्याने होत आहेत. शेतात पिकांमध्ये छुप्या पद्धतीने हि लागवड करण्यात येत असते. अशाच प्रकारे शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथे पिकांमध्ये लागवड करण्यात आलेला २१ लाखाचा गांजा जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Shahada News) शहादा पोलिसांकडून करण्यात आलेली हि कारवाई मोठी मानली जात आहे. दरम्यान नंदुरबारमध्ये (Nandurbar) कालच गांजाची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत साधारण १ लाख रुपये किमतीच्यावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यानंतर नंदुरबार जिल्ह्यातच दुसऱ्या दिवशी हि कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील शेतशिवारात शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. शेतात लागवड करण्यात आलेला साधारण २१ लाख किमतीचा हा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindkheda Exit Poll: पवारांचा करिष्मा चालणार का? सिंदखेडाची जनता कोणाला निवडणार? पाहा Exit Poll

Exit Poll : धीरज देशमुख पुन्हा आमदार होणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Exit Poll: धामणगाव मतदारसंघातून विरेंद्र जगताप होणार आमदार? पाहा Exit Poll

Nevasa Exit Poll: नेवासा मतदारसंघात कोण होणार आमदार? Exit पोलचा अंदाज काय

Exit Poll Maharashtra : राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT